दोन रेल्वे गाड्यांच्या डब्यांना आग ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

जुलै 14, 2025 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तिरुपतीमधून धक्कादायक बातमी असून रेल्वे स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या हिसार एक्सप्रेस आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना आग लागल्याचे समोर आले आहे. या डब्याना आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित उर्वरित डबे वेगळे केले, त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. दरम्यान यापूर्वी काल रविवारी चेन्नई-अरक्कोनम रेल्वे मार्गावर एका कच्च्या तेलाच्या टँकर ट्रेनला आग लागली होती, त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज डब्यांना आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

tr fire

दरम्यान या रेल्वे गाड्यांना नेमकी आग का लागली ही अद्यापही समोर आले नसून मात्र याबाबत शोध घेतला जाणार आहे. याबाबत असे की, राजस्थानहून आंध्र प्रदेशातील तिरुपतीला जाणाऱ्या हिसार एक्सप्रेसला आग लागल्यामुळे तिरुपती रेल्वे स्थानकाजवळ गोंधळ उडाला होता. आग लागलेल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर निघत होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले, त्यामुळे मोठी हानी टळली आहे.

रेल्वेच्या डब्यांना आग लागल्यानंतर हिसार एक्सप्रेसजवळून जाणारी वंदे भारत ट्रेन थांबवण्यात आली, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. रेल्वेला ही आग का लागली याच्या कारणाचा शोध घेतला जाणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग पसरू नये म्हणून बाधित डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now