⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे घडलीय. नारायण बाबुराव पाटील (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटील यांच्याकडे काही प्रमाणात कर्ज होते. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्येमुळे आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे.

नारायण बाबुराव पाटील (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे वास्तव्यास होते. पाटील यांच्याकडे काही प्रमाणात काही प्रमाणात कर्ज होते. तयामुळे कर्जबाजारीपणामुळे ते नैराश्यात होते. या नैराश्यातूनच दि. २१ रोजी नारायण पाटील हे स्वत:च्या मोटारसाईकलने गावापासुन पाच कि मी अंतरावर असलेल्या मलकापुर रस्त्यावरील कुंड गावानजिकच्या पुर्णा नदीवरील उंच पुलावर गेले व क्षणाचाही विलंब न करता पुलावरुन थेट नदीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली.

घटनास्थळी मासेमारी करणाऱ्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्नदेखील केला, मात्र. या प्रयत्नांना यश आले नाही. दुसऱ्या दिवशी २२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळुन आला. सुभाष वसंतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नारायण पाटील शांत व साध्यासरळ स्वभावाचे तसेच परीसरातुन सर्वांना परीचित होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी व एक मुलगा आहे.