⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

शितपेयांचे एफडीएने घेतले नमुने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२। दरवर्षी उन्हाळ्यात उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून शितपियांच्या मागणीत माेठी वाढ होत असते. मात्र त्यासाेबतच भेसळीचे प्रमाण देखील वाढत असते. या वरील नियंत्रणासाठी अन्न औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी व कारवाईला सुरुवात करण्यात आली असून दाेन दिवसांत चार उत्पादकांकडून शीतपेय व लस्सीचे नमुने घेण्यात आले आहे.

थंड पेयांची मागणी वाढल्याने त्यात भेसळीची शक्यता अधिक असते. त्यावर नियंत्रणासाठी एफडीएने राम भरकड व किशाेर सांळुखे या दाेन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे विशेष पथक या तपासणीसाठी नियुक्त केले असून या पथकाने बुधवारी शनिपेठ भागातील दाेन लस्सी उत्पादकांकडून लस्सीचे व दाेन पेप्सी निर्मात्यांकडून पेप्सीचे नमुने ताब्यात घेतले आहे.