---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा पाचोरा भडगाव

शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ मिळावे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ घ्यावा, अशी मागणीचे निवेदन तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना देण्यात आले. दरम्यान, अनुदान जमा न झाल्यास शेतकऱ्यांसमवेत कार्यालयास घेराव घालून आंदोलन छेळण्याचा इशारा देण्यात आला.

bjp 1 jpg webp

जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वरदान ठरलेली आहे. मात्र, सदरील योजनेबाबत शेतकऱ्यांच्या समवेत चर्चा करत असताना असे निदर्शनास आले होते. की शेतकरी गटांना दिलेल्या लाभाच्या अनुदान मागील ४ ते ५ महिन्यांपासून (डेस्क – ७) मुंबई स्तरावर प्रलंबित असून याबाबत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. तसेच तालुक्यातील ८८० शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लक्ष व भडगाव तालुक्यातील २०५ शेतकऱ्यांचे ७४.९९ लक्ष असे दोघे तालुक्यातील एकूण १०८५ शेतकऱ्यांचे एकूण ७ कोटी १९ लक्ष ९९ हजार अनुदान आज तागायत प्रलंबित असुन याबाबत येत्या १० फेब्रुवारीपर्यंत सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरिता प्रयत्न करावे. अशी मागणीचे निवेदन तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना देण्यात आले.

---Advertisement---

दरम्यान, अनुदान जमा न झाल्यास भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत जळगाव येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यलयाला घेराव घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोरा येथे आलेल्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांना प्रत्यक्ष भेटुन दिला.

याप्रसंगी पं.समिती सदस्य बन्सीलाल पाटील, प्रशांत सोनवणे, भैया चौधरी, पप्पु पाटील तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---