⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

फाली संमेलन : भारताचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात : बुर्जीस गोदरेज

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । ही विद्यार्थी भारताचे भविष्य आहे. अ‍ॅग्रिकल्चर मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी असून यामध्ये केवळ ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे आणि हे विद्यार्थी शोधत आहे. त्यामुळे मला आनंद होतोय की, मी या ठिकाणी आहे. गेल्यावर्षी आम्ही १० विद्यार्थ्यांना कंपनीत इंटर्नशिपसाठी घेतले होते. विद्यार्थ्यांची जाणून घेण्याची इच्छा व मेहनत घेण्याची वृत्ती खरोखरीच कौतुकास्पद असून हे विद्यार्थी भविष्यात आमचे कर्मचारी व कोस्टमर असतील. याचा मला आनंद होत असून भविष्यात या विद्यार्थ्यांना व्हेन्चर प्रोग्रॅमच्या माध्यमातून मेन्टेर्शीप देणार असल्याचे प्रतिपादन गोदरेज अग्रोवेटचे संचालक बुर्जीस गोदरेज यांनी केले.

जैन हिल्स येथे फाली आठवे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि. ५ रविवारी रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी फाली संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. पंचावर जैन इर्रीगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, गोदरेज चे संचालक बुर्जीस गोदरेज, स्टार अ‍ॅग्रीचे अमित अग्रवाल हे होते. फ्युचर अ‍ॅग्रिकल्चर लिडर्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांनी कृषी व्यवसाय मॉडेल्सचे सादरीकरण केले. आकाश मैदानावरील डोम मध्ये ६८ नावीण्यपूर्ण (इन्होवेटिव्ह) उपकरणे मांडण्यात आलेले होते. यामध्ये हॅचिंन मशीन, खत फवारणीचे मशीन, सायकलच्या माध्यमातून शेतात फरवर्णी करणारे यंत्रण, अ‍ॅग्रिकल्चर केलवेअर बेल्ट, क्रॉउप सेंस, ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून १५ मिनिटात ५ एकर फवारणी केली जाणारे यंत्र, खत टाकण्याचे यंत्रण असे अनेक यंत्रणे दुसऱ्या सत्रात प्रदर्शन करण्यात आले होते.

शेती अत्याधुनिक पद्धतीने करा : अनिल जैन

हल्लीच्या मुलांना गावाकडे राहायला आवडत नाही. परंतु, त्यांनी गावाकडेच आपलं मन धरून ठेवलं पाहिजे. भविष्यात शेती हाच सर्वांगीण प्रगती आहे. त्यामुळे या क्षेत्रात रुजून शेती अत्याधुनिक पद्धतीने करण्याचे प्रयत्न करायला हवे, व स्वतःच्या पायावर उभं राहायाला हवं. शेतकऱ्यांनी देखील शेती अत्याधुनिक पद्धतीने केल्यास चांगला उत्पन्न मिळवू शकतो, त्यातून आपल्या मुलं बाळांना चांगले शिक्षण देऊ शकता. तसेच गावात राहूनही आपण देशाची सेवा करू शकता, तसेच नजिकच्या काळात फाली उपक्रमातून नव उद्योजक बनण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपची व्यवस्था करण्यात येईल, स्कॉलरशीप देण्यात येईल अशा माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षित विद्यार्थी शेती करण्यासाठी सहभागी होती. फाली व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी हे ज्ञान खुले व्हावे ह्यासाठी पोर्टल देखील सुरू करण्याची योजना असल्याचे प्रतिपादन जैन इर्रीगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले. तर स्टार अ‍ॅग्रीचे अमित अग्रवाल यांनी नजिकच्या काळात विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल देऊन गुणात्मकपणे त्यांची वाढ कशी करता येईल याबाबत सांगितले.