जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । भुसावळ रेल्वे स्थानकावर भारतीय चलनातील तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्याची माहिती समोर आलीय. इतक्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संशयितांच्या बॅगेत नकली नोटा आढळून आल्या असून या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मलकापूरकडून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांचा रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबवत त्यांची तपासणी केली असता संशयितांच्या बॅगेत सुमारे एक कोटीच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांकडून तपासणी सुरु असतानाच एकजण फरार झाला आहे. तर दुसरा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.
बॅगेत असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा ठेवण्यात आल्या होत्या. अशा साधारण तपासणी दरम्यान संशय त्यांच्या बॅगमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या जवळपास नकली नोटा आढळल्या असल्याची माहिती आहे. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून यातील एक जण फरार ते दुसरा संशयीताची रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.