आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हॅक : गुन्हा दाखल

सप्टेंबर 29, 2022 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फेसबुक अकाऊंट हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड करण्यात आला आहे.

MAL mangesh chavhan jpg webp

चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला आहे. एवढेच नव्हे तर, फेसबुक पेजला कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिड कार्डमधून ७० हजार काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार असे की, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडीयावरील फेसबुक अकाऊंट मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हे हॅक केले. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा व हातात चाकु घेतलेले व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्यात. एवढेच नव्हे तर मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणुक केली. प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेजचे कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के रा.टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव यांच्या तक्रारीवरुन जळगाव सायबर पोलिासत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाभर कानडे हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now