⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रावेरातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ : भर दिवसा सव्वादोन लाखांची रोकड लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । रावेर शहरातील ओम सुपर शॉपीजवळील रूपम शॉपींग समोरन सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी भर दिवसा लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पाळत ठेवून चोरट्याने ही चोरी केल्याचा अंदाज आहे. रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक छोटू पाटील (64, जुना सावदा रोड, तिरुपती नगर, रावेर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्मचारी असून कामानिमित्त सव्वादोन लाखांची रोकड बँकेतून काढल्यानंतर ती एका लहान बॅगेत ठेवली व कामानिमित्त ते रूपम शॉपींग मॉलच्या बांधकाम सुरू असलेल्या जागी आले असता त्यांनी स्कुटीलाच बॅग अडकलेली ठेवली व याचवेळी पाळत ठेवून असलेल्या व अंगात निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या सडपातळ चोरट्याने संधी साधून बॅग लांबवली.

या बॅगेत सव्वादोन लाखांची रोकड तसेच बँक ऑफ महाराष्ट्र व आयडीबीआय बँकेचे पासबुक होते. पाटील यांनी रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत