⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दिव्यांग बांधवांचे स्वतंत्र मंत्रालय निर्णयाचे एरंडोलात स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्मितीचा निर्णय घेतला, याबद्दल एरंडोल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला तसेच उपस्थितांना मिठाईचे देखील वाटप करण्यात आले.

या प्रसंगी रमेश चौधरी, पंकज मराठे, सोनू वाणी, निर्मल चौधरी, प्रदीप फराटे, किसन पाटील, नाना घोडेस्वार, नितीन वाणी, बालू पाटील, गौरव पाटील, मुश्ताक पिंजारी, अफसाना सैय्यद, गोकुळ परदेशी, अश्विनी महाजन, अमरलाल शिरवाणी, नामदेव महाजन, परेश महाजन, शिवाजी पाटील, अरूण बोरसे, पुजा शिरोडे, दिपाली सोनवणे, गायत्री, खरोटे  उपस्थित होते.