पंकजा मुंडेंवरून एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा

सप्टेंबर 28, 2022 9:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । अनेक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी वेचलं,त्या कालखंडात खूप मेहनत केली, परिश्रम घेतले, त्या परिसरामध्ये पक्षाला चांगले दिवस गोपीनाथ मुंडे यांनी आणून दिले. त्यामुळे अशा गोपीनाथा मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची भाजपकडून उपेक्षा होत आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी केली.

यावेळी ते म्हणाले कि, अनेक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी वेचलं, या काळात खूप मेहनत केली, परिश्रम घेतले, त्या परिसरामध्ये पक्षाला चांगले दिवस गोपीनाथ मुंडे यांनी आणून दिले. त्यामुळे अशा गोपीनाथा मुंढे यांच्या कन्या असल्याने स्वाभाविकच पक्षाकडून त्यांना मान सन्मान मिळायला पाहिजे. पक्षामध्ये चांगलं स्थान मिळायला पाहीजे मात्र ते होताना दिसत नाहीये असे खडसे म्हणाले.

भाजपकडून पंकजा मुंडे यांची उपेक्षा होत आहे. पंकजा मुंडे यांना एवढ्या वर्षात ना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, न विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. ही पंकजा मुंडे यांची उपेक्षाच असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. पंकजा मुंडे यांना असं वाटतं, की अंतर्गत वादामुळेच पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पक्षामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखविली आहे. असेही खडसे म्हणाले.

munde and khadse jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now