---Advertisement---
मुक्ताईनगर राजकारण

खडसेंचा शिवसेना आमदाराला ऑडिओ क्लिप जारी करण्याचा इशारा

eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । राज्याच्या सत्तेत शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र असली तरी पण मुक्ताईनगरमध्ये मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) विरुद्ध शिवसेना आमदार चंद्रकांत (MLA Chandrakant Patil) पाटील असा संघर्ष पेटला आहे. मागील दोन दिवसापूर्वी खडसे समर्थक व आ.चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संबधित त्यांच्या चालकाची ऑडिओ क्लिप जारी करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आमदार पाटील यांनी खडसेंनी ती क्लिप समोर आणावीच, असं प्रतिआव्हान दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

eknath khadse

खडसेंचा नेमका इशारा काय?
खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी संबधित त्यांच्या चालकाची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच एका महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केलं असून त्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत, असा दावा खडसे यांनी केला आहे. यातील एका क्लिपमध्ये महिलेच्या नवर्‍याला ती व्यक्ती त्याच्या पत्नीला आमदारांकडे पाठवण्याचं स्पष्टपणे सांगत आहे. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

---Advertisement---

नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच- खडसे
तसंच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत, त्याविरोधात आम्ही तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत, असा दावा खडसे यांनी केला आहे. दुसरीकडे आमदार पाटील यांनी खडसेंनी ती क्लिप समोर आणावीच, असं प्रतिआव्हान दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---