---Advertisement---
बातम्या

म्हणून अजितदादा अमित शाहांच्या दौऱ्याला गैरहजर? एकनाथ खडसे यांनी थेट सांगितलं कारण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर निवासस्थानीही भेट दिली.

ekanth khadse ajit pawar jpg webp webp

पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गैरहजर राहिले. हीच गैरहजेरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या मुंबईच्या दौऱ्याला अजित पवार का होते गैरहजर? याच कारण थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

---Advertisement---

अजित पवार यांनी हजर रहावं की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना डावलंलं जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही नाराजी अजित पवार यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर गैरहजर राहून दर्शविली आहे.असं एकनाथ खडसे म्हणाले

अजित पवारांकडून स्पष्टीकरण
।दरम्यान, कालच्या अमित शाह यांच्या दौऱ्यावर गैरहजरबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी काल बारामती येथे होतो. मी अगोदरच नियोजन करुन बारामतीच्या पाच संस्था, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दुध संघ, बारामती बाजार समिती या सगळ्या संस्थांची वार्षिक बैठका लावल्या होत्या, त्यामुळे मी मुंबईत नव्हतो. मी अगोदरच अमित शहांच्या कार्यालयाला या संदर्भात कळवले होते. अमित शाहांचा दौरा असला, तरी तिथे मी नाही. माझा आधीच दौरा ठरला आहे, असंही अजित पवार म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---