रविवार, डिसेंबर 3, 2023

एकनाथ खडसेंचा आता जळगावातील ‘या’ आमदारावर अब्रूनुकसानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse)यांनी आता भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. याप्रकरणी शनिवारी पहिली सुनावणी पार पडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांना करंटा, निकम्मा असे बदनामीकारक शब्द वापरले, असे याचिकेत म्हटले आहे. यात एकनाथ खडसे यांचा काहीही संबंध नसतांना हे शब्द वापरून त्यांची बदनामी व अब्रूनुकसानी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान ४९९, ५०० माहिती आणि तंत्रज्ञान कायदा ६६ ‘अ’ प्रमाणे फौजदारी व अब्रूनुकसानीचा दावा खडसे यांनी दाखल केला आहे.

या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. खडसे यांच्यातर्फे ॲड. अतुल सूर्यवंशी काम पाहत आहेत.