⁠ 
सोमवार, जुलै 1, 2024

एकनाथ खडसेंनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला डिवचले ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । शुक्रवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. या अर्थसंकल्पावरून विरोधक सरकारवर टीका करत असून अशातच भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुका समोर ठेऊन सादर केलेला आहे. वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. घोषणा चांगल्या आहेत. मात्र आता वेळ नाही. सध्या राज्य सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असा टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अजूनही एकनाथ खडसे हे वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला डिवचले आहे.