⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ; खाद्यतेलाच्या किमतीत मोठी कपात

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे खाद्यतेलाच्या किमतीत ३० रुपयाची कपात करण्यात आलेली आहे. फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणारी खाद्यतेल कंपनी अदानी विल्मारने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. Edible oil Prices

गेल्या काही दिवसापूर्वी महागड्या खाद्यतेलाने होरपळून निघणाऱ्या जनतेला आता काही दिलासा मिळताना दिसतोय. जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतात तेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खाद्यतेलाच्या किंमतीत १० ते १५ रुपयाची कपात करण्यात आलेली होती. त्यानंतर आता फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणारी खाद्यतेल कंपनी अदानी विल्मारने जागतिक तेलाच्या किमतीत घट झाल्याने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती.

सोयाबीन तेल 165 रुपयांवर घसरले
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे. फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अंगशु मलिक म्हणाले, “आम्ही जागतिक स्तरावर किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि नवीन माल लवकरच बाजारात पोहोचेल.