पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी संस्थेत मोठी पदभरती

मार्च 22, 2022 1:43 PM

ECGC PO Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी चालून आलीय. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ECGC ने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार १ मार्चपासून ECGC च्या अधिकृत वेबसाइट ecgc.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. लक्षात घ्या की भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (सरकारी नोकरी 2022) 20 एप्रिल 2022 आहे.

job jpg webp

एकूण जागा : 75

ज्यामध्ये 11 पदे SC साठी, 10 ST साठी, 13 OBC साठी आणि 7 EWS साठी राखीव आहेत. तीच 34 पदे अनारक्षित आहेत.

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीची मागणी करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. परीक्षा २९ मे २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

वयोमर्यादा
21 ते 30 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

वेतनमान (Pay Scale) : ५३,६००/- रुपये ते १,०२,०९०/- रुपये.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now