⁠ 
बुधवार, मे 8, 2024

व्हिडीओ : जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांची दारूच्या नशेत पत्रकारांशी अरेरावी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांनी पत्रकारांना केलेल्या फोनला उत्तर न देता अरेरावी केली. पत्रकारांना घराजवळ बोलवीत त्यांच्याशी हुज्जत घालून मद्यपान केलेल्या स्थितीत एका पत्रकारावर हात उचलला.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात असलेले वैद्यकीय अधीक्षक वैभव सोनार यांना पत्रकार चेतन वाणी यांनी माहिती विचारण्यासाठी संपर्क केला. सोनार यांनी माहिती न देता त्यांना घराजवळ बोलाविले, यावेळी पत्रकार वसीम खान, जकी अहमद, तुषार भांबरे देखील सोबत होते. सोनार यांनी दरवाजा उघडत पत्रकारांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

पत्रकार त्यांना माहिती विचारत असतांना सोनार हे मद्यपान केलेले दिसून आले. मी राजीनामा देईल, मला काही देणं घेणं नाही, तुम्हाला काय करायचं अशा अविर्भावात ते बोलत होते. सोनार मोबाईलवर कुणाशी तरी बोलत बाहेर आले आणि त्यांनी वसीम खान यांच्यावर हात उगारला त्यात वसीम यांचा मोबाईल खाली पडला. सोनार यांच्या वर्तवणुकीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली असून व्हिडीओ आणि मोबाईल रेकॉर्डिंग पाठवली आहे.

पहा व्हिडीओ :