डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.प्रशांत सोळंके हे नुकतेच रुजु झाले आहेत. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले डॉ.प्रशांत सोळंके यांचे एमबीबीएस व एम डी. (कम्युनिटी मेडिसीन) चे वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून झाले आहे.
डॉ सोळंके यांना २० वर्ष अध्ययनाचा प्रदिर्घ अनुभव असून त्यांनी तेलंगणा, तामिळनाडू ह्या राज्यांमध्ये सेवा दिली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जरनल मध्ये ३३ संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. “कम्युनिकेशन स्किल्स फॉर मेडिकल प्रोफेशन्स” ह्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नॅक-आयक्यूएसीचे समन्वयक म्हणून त्यांना अनुभव आहे. डॉ.सोळंके यांना नॅशनल बिल्डर पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ.प्रशांत सोळंके हे कार्यरत झाले आहेत.