गुरूवार, जून 8, 2023

Amazon वर Redmi च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर सूट, खरेदीचा चान्स सोडू नका..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । तुम्ही जर का Redmi कंपनीचा नवीन स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. 19 मे पासून Amazon वर नवीन सेल सुरु झाला असून या सेलमध्ये Redmi च्या बजेट स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.

या सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे फोन मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. तुम्हालाही उत्तम फीचर्स असलेला फोन स्वस्तात घ्यायचा असेल तर तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. सेलमध्ये Redmi 10A, Redmi 9, Redmi A1 वर डिस्काउंट उपलब्ध आहेत.

Redmi 10A
Redmi 10A फोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. Amazon सेलमध्ये 29% डिस्काउंटनंतर ते Rs.8,499 मध्ये खरेदी करता येईल. तुम्ही दरमहा 406 रुपयांना EMI वर फोन खरेदी करू शकता. यासोबतच हा फोन नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल. HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास 830 रुपयांची झटपट सूट दिली जाईल. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तसेच 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे जी 10W फास्ट चार्जरसह येते.

रेडमी 9
हा Redmi फोन Amazon सेलमध्ये 14% च्या डिस्काउंटवर विकला जात आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 9499 रुपये राहते. यासोबतच HDFC बँकेच्या कार्डवरून फोन खरेदी केल्यास तुम्हाला 949 रुपयांची झटपट सूट मिळेल. फोनमध्ये MediTek Helio G80 प्रोसेसर आणि 5020mAh पॉवरफुल बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन 13MP + 8MP + 5MP + 2MP कॅमेरा सेट-अप सह येतो. सेल्फीसाठी यात 8MP कॅमेरा आहे.