---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

विजयाचा जल्लोष करतांना फडणवीस, गिरीश महाजनांच्या कानात काय कुजबुजले? पहा व्हिडीओ…

---Advertisement---


जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्‍वास म्हणून भाजप आमदार गिरिश महाजन यांची ओळख आहे. तोडाफोडीच्या राजकारणात महाजनांचा मोठा हातखंड मानला जात असल्याने ते भाजपाचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. आता शिवसेनेचे वजनदार नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर सेनेचे १३ आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु असतांना इतकी मोठी राजकीय खिचडी शिजत होती मात्र त्याची कुणकुण कुणालाही लागली नाही, हे विशेष! याच्याशी निगडीत फडणवीस व महाजन यांचा एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे. यामुळे विजयाचा जल्लोष करतांना फडणवीस, गिरिश महाजनांच्या कानात काय कुजबुजले? असं कोडं संपूर्ण राज्याला पडले आहे.

fadanis mahajan jpg webp

सोमवारी रात्री विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विधान भवनाच्या परिसरात भाजप नेत्यांनी एकमेकांच्या गळाभेटी घेत जल्लोष साजरा केला. हि निवडणूक भाजपासाठी म्हणण्यापेक्षा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. राज्यसभेत करिष्मा केल्यानंतर फडणवीस विधान परिषदेतही चमत्कार करतील का? याकडे राज्याचेच नव्हे तर दिल्लीचेही लक्ष लागून होते. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाचे पाचवे उमेदवार दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या जोरावर निवडून आले. यामुळे फडणवीसांनी मैदान मारले.

---Advertisement---

भाजपातर्फे जल्लोष साजरा होत असतांना फडणवीसांची अवघ्या १० ते १२ सेकंदांची एक कृती आता चर्चेत आली आहे. भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात होतात फडणवीस यांची भाजपा आमदार गिरिश महाजन यांनी गळाभेट घेतली. यामुळे महाजन प्रचंड आनंदात होते मात्र फडणवीस काहिसे गंभीर भावमुद्रेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी महाजन यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर महाजनांचा चेहरा थोडासा गंभीर मुद्रेत दिसून आला. कुणाला काही कळण्याच्या आत फडणवीस यांनी पुन्हा आनंदी चेहरा करत अन्य आमदारांकडून शुभेच्छा स्विकारल्या.

https://www.facebook.com/girishmahajansupporter/videos/742717760495263/

हेही वाचा : Eknath Shinde Updates : शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील आहेत कुठे, मुंबई का गुजरात?

फडणवीसांनी भाजपाला इतका मोठा विजय मिळवून दिल्यानंतरही त्यांच्या चेहर्‍यावर कसली चिंता होती? याचे कोडं मंगळवारी सकाळी उलगडलं आहे. शिवसेनेते वजनदार नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे ठाकरे सरकार प्रचंड अडचणीत आले आहे. शिंदे हे त्यांच्या १३ समर्थक आमदारांसह सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यांची व्यवस्था भाजपा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी केली असून शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी पाटील यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहेत.

दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस सर्व कार्यक्रम सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही वेळापूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या सर्व घटनांची कडी जोडून पाहिल्यास फडणवीस, महाजनांच्या कानात काय बोलले? येथे येवून थांबत आहे.

हे देखील वाचा :
एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या नाराज आमदारांचे आहे ‘जळगाव कनेक्शन’!
…नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता ; नारायण राणेंचे ट्विट

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---