---Advertisement---
जळगाव जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर येणार ; असे आहेत दौऱ्याचे नियोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 27 जानेवारी 2024 । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जळगाव दौऱ्यावर येत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत.

ajit pawar 2 jpg webp webp

तसेच चोपडा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांच्या उपस्थित यावल येथे पक्षाचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

---Advertisement---

पवार म्हणाले की, अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत. या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घन:श्‍याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही होणार असल्याने तेथे ते उपस्थित राहणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---