⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

कुऱ्हा येथे शादीखाना हाॅलचे लोकार्पण

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथे शादीखाना हाॅलचे लोकार्पण रविवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

अल्पसंख्यांक मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निधीतुन शादीखाना हाॅलचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम पुर्ण होऊन रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्रोउद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहीणी खेवलकर, पंचायत समिती सभापती सुनिताताई चौधरी, उपसभापती सुवर्णाताई साळुंखे, जि.प.सदस्या वैशाली तायडे, वनिता गवळे, सरपंच सुनिता मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, माजी जि.प.सदस्य सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, महिला तालुका आघाडी अध्यक्षा रंजना कांडेलकर, जिल्हा संयोजक विशाल खोले, माजी सढापती दशरधशथ कांडेलकर, तालुका युवक अध्यक्ष राजेश ढोले, विलास धायडे, राजु माळी, विकास पाटील, माफदाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या तीस वर्षांतअंल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला.जेथे जेथे अंल्पसंख्यांक समाज आहे तिथे तिथे शादीखाना, कबरस्थान तसेच रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला. समाज शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी मुक्ताईनगर येथे पाॅलीटेक्निक काॅलेजचे पुढील वर्षापर्यत काम पुर्णत्वास येऊन मोफत शिक्षणाची सोय होणार असे मत माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केले.

तसेच कुऱ्हा-वडोदा उपसासिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली असुन लवकरच काम पुर्ण होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणुन दिलेला शब्द पुर्ण करेल. तसेच कुऱ्हा बायपास रस्त्याच्या कामाबाबत अडचणी दुर झाल्या असुन लवकरच निधी उपलब्ध करुन काम मार्गी लागेल. विकासकामे करण्यासाठी मी व पक्ष कटीबध्द असल्याचेही सांगितले. आपण जसे गेली तीस वर्षे सोबत राहीले तसेच सोबत राहुन येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. रोहीणी खेवलकर यांनी परीसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आणि आज सुद्धा कुठले पद नसताना त्यांच्या शब्दाला शासन दरबारी किंमत असुन त्याद्वारे सर्व गोरगरीब जनतेची कामे करत असतात. सकाळपासुन त्यांच्याकडे लोकांची गर्दी असते. यातुनच नाथाभाऊ हे लोकनेते असल्याची प्रचिती येते. गेल्या तीस वर्षात अनेक विकासकामे केली राहीलेली कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाथाभाऊ व मी,रोहीणी प्रयत्नशील आहोत असे मत व्यक्त केले.