⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

गोठ्यात घुसून बिबट्याने वासरी व गोर्याचा पाडला फडशा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बिबट्याची दहशत पाहायला मिळत असून गावाजवळील दोन किमी अंतरावर असलेल्या पळासरे रसत्यालगत गोठ्यात बिबट्याने घुसून वासरी व गोर्याचा फडशा पाडल्याची घटना आज पहाटे उघडकीस आलीय. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत असे की, वरखेडे येथील शेतकरी (Farmer) पंकज पवार हे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात दुध काढण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत अवस्थेत दिसले. तर गोऱ्हाचा फडशा पाडुन लोखंडी जाळीतुन उसाच्या शेतात ओढुन नेले होते. पंकज पवार यांनी गोर्याचा शोध घेतला. परंतु गोऱ्हा आढळला नसुन रक्ताचे डाग व काही अवशेष ठीकठिकाणी पडलेले होते. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर घटनास्थळी वनमजुर तानाजी सोनवणे यांनी पहाणी केली. या भागात गेल्या एक ते दोन महिन्यांपासुन बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पाच वर्षापूर्वी 2016 मध्ये गिरणा (Chalisgaon News) पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालता होता. त्याला शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केल्यानंतरही गिरणा पट्ट्यातील बिबट्याचे भय संपले नाही. वन विभागाने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा 2016ची पुनरावृत्ती होण्याची भिती गिरणा पट्ट्यातील नागरीकांमध्ये आहे