---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

Chalisagaon : गुढीपाडव्याला नवीन कार घेतली, पण दुसऱ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदी केल्यानंतर कुटुंब आणि मुलांमध्ये आनंद होता. मात्र कार घेतल्यानंतर दोन दिवसांनीच आनंदावर विरजण पडले. गाडीने घराकडे येताना दुसऱ्या एका कारने मागून धडक दिली. यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देवांश दिनेश महाजन (वय ५) असं अपघाताती मयत मुलाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

चाळीसगाव शहरातील श्रीपतनगर परिसरातील रहिवासी दिनेश महाजन यांनी गुढीपाडव्याला कार खरेदी केली होती. या कारने धुळ्याकडून ते चाळीसगावकडे येण्यासाठी निघाले होते. यावेळी गाडीत दिनेश महाजन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्वाती महाजन, मुलगी आरोही (वय १०) व मुलगा देवांश (वय ५) हे देखील होते. तर त्यांच्या गाडीच्या मागे एक कार देखील चाळीसगावच्या दिशेने येत होती.

---Advertisement---

चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील डेराबर्डी भागात दिनेश महाजन यांच्या गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डॉ. उत्तमराव महाजन यांच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की कारमधील पाच वर्षीय देवांश हा थेट गाडीतून बाहेर फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने झाली. या अपघातात दिनेश महाजन, स्वाती महाजन व आरोही महाजन हेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार घेतल्याच्या दोन दिवसांनी अपघात घडून मुलाचा मृत्यू झाल्याने आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment