⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दादावाडी स्टॉप’च्या’ खड्ड्याला मिळाले नंबर १ चे पारितोषिक!

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । शहरातील खोटे नगर ते बेंडाळे स्टॉप उड्डाणपूल खाली असलेल्या दादावाडी स्टॉप नजीकच्या अंडरपासला लागून असलेला सर्विस रोड बांधून सहा महिने देखील उलटे नाही, तोवर रस्त्याची बिकट दुर्दशा झाली आहे. त्या ठिकाणी भले दोन मोठे खड्डे पडलेले आहेत, व ते पास करताना नागरिकांची खूप अशी दमछाक होते, एवढेच नाही तर त्या खड्ड्यात पडून कोणाचा जीव देखील जाऊ शकतो असे सतत जाणावते.

परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करून देखील या खड्ड्यांची दखल घेण्यात आली नाही, म्हणून नागरिकांनी शेवटी प्रसारमाध्यमांकडे मदतीचा हात मागितला आणि आमचे कोणी ऐकेल का? आमच्या जीवाची किंमत इतकी काडीमोल झाली आहे का? असा प्रश्न थेट कुंदन सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांतून लोकप्रतिनिधींना केला. समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जावे म्हणून परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष कुंदन यादवराव सूर्यवंशी यांनी ॲडव्होकेट कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून एक प्रतियोगितेचे आयोजन केले.

जळगाव मधील जो सर्वात मोठा खड्डा असेल त्याला नंबर एकचे खड्डा रत्न पारितोषिक देण्यात येईल व त्यामध्ये दादावाडी स्टॉप चा खड्डा हा नंबर एकचा पारितोषिक विजेता ठरला व त्याला खड्डारत्न पारितोषिक क्रमांक एक घोषित करण्यात आला. आणि लवकरात लवकर यावर उपाय योजना नाही केल्यास, आम्ही परिसरातील सर्व नागरिक तीव्र आंदोलन शेडू असा इशारा देखील दिला आहे.