जळगाव लाईव्ह न्यूज । Cyclone Asani । बंगालच्या उपसागरात तयार झालेला ‘असानी’ चक्रीवादळाचा फटकाआंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांना बसला आहे.या चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना या वादळाचा थेट फटका बसणार आहे.
आज कोकणात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तर विदर्भात पाऊस आणि उष्णतेचा कहर पाहायला मिळेल. आजच नाहीतर उद्याही राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8 am, 11 May, असनी चक्री वादळाचा प्रभाव …
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2022
राज्यात कोकणात, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा काही भागात ढगाळ वातावरण…
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली..
तसेच कर्नाटका केरळ सुद्धा… pic.twitter.com/4YxM0T1UJV
या चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. इतकंच नाहीतर या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांत होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात ११ मेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर जोरदार वारेही वाहतील, ज्याचा वेग ताशी ४० ते ६० किलोमीटर असू शकतो.