जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी वादळीवाऱ्यासह अवकाळी गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिके जमीनदोस्त झाली या संकटामुळे शेतकरी वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ. राजु मामा भोळे आज उमाळे देव्हारी धानवड व चिंचोली शिवारात पाहणी केली.
तालुक्यातील शिवारातील अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली आहे. तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या नुकसानीची आमदार राजूमामा भोळे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधुन तालुक्यातील उमाळे, देव्हारी ,धानवड व चिंचोली शिवारात पाहणी केली. यावेळी तहसिलदार व प्रांत यांच्यासोबत सुध्दा आमदार फोनवर चर्चा करुन नुकसानीची माहिती देऊत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान पाहुन आमदार राजुमामा यांनाही गहिवरून आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.
भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना दिला. यावेळी भाजपा नेते चंद्रशेखर अत्तरदे, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जळगाव बाजार समितीचे माजी उपसभापती मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस संदिप पाटील, अरूण सपकाळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, मिलिंद भाऊ लाड, नंदलाल पाटील, गिरीश वराडे आधार पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.