⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

तरुणीच्या नामे बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले अन..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । तरुणीच्या नावाने इंस्टाग्राम, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर बनावटीचे खाते तयार करून फसवणूक केल्याची घटना आपण अनेकदा सोशल मीडियावर वाचत असतो. यात काही नवीन नाही परंतु, काही घटना ह्या भयंकर असतात. घटना घडल्यानंतर पोलिसांत गुन्हा नोंद केल्या जातो. त्यात काही भामट्यांचा तपास लागतो तर काहींचा पत्ताच लागत नाही.

अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव तालुक्यातील आदर्श नगरात घडली आहे. चक्क भामट्याने स्वतःची ओळख लपवून तरुणीच्या नाव व फोटोचा वापर करून बदनामीच्या उद्देशाने इंस्टाग्रामवर बनावटीचे खाते तयार केले आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध भा, कलम १०५ सह It अक्ट ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीलीलाधर कानडे करीत आहे.