पती पत्नी एका आठवड्यात ठरले कोरोनाचे बळी

कोरोनाने दररोज कुणाचा ना कुणाचा मृत्यू होत असून एकाच कुटुंबातील अनेकांचा बळी जात असल्याचे समोर येत आहे. शिवकॉलनीत राहणाऱ्या पती पत्नीचा देखील एकाच आठवड्यात कोरोनाने बळी घेतला आहे.

शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणारे जिल्हा परिषदेचे निवृत्त कक्षाधिकारी शशिकांत रुपचंद बाविस्कर (वय ६९) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अचानक त्यांची प्रकृती खालावली.

पत्नी निर्मला बाविस्कर (वय ६२) यांना देखील कोरोनाचे निदान झाले. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.१२ रोजी निर्मला बाविस्कर यांचे तर दि.२० रोजी शशिकांत बाविस्कर यांचा मृत्यू झाला. दोघांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.