जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२६ । सध्या सोन्यासह चांदीचे दर गगनाला भिडले आहे. भू-राजकीय तणावामुळे मागच्या काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये मोठी चढ-उतार होत असल्याचं दिसून आले. दरम्यान, ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात जवळपास ४०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

सोन्याचे आजचे दर
आज १७ जून रोजी जळगावच्या सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर खाली आले आहेत. आज जळगावात १० ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह (GST) १ लाख ५४ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्यात ४०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

चांदीच्या दरात ४ हजारांची मोठी पडझड
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दराने ग्राहकांना अधिक मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांत चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते, परंतु आज त्यात तब्बल ४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज १७ जून रोजी जळगावात १ किलो चांदीसाठी जीएसटीसह (GST) २ लाख ५७ हजार ५०० रुपये भाव निश्चित झाला आहे.
बाजार तज्ज्ञांचा अंदाज:
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि मागणी-पुरवठ्यातील बदलांमुळे सोन्या-चांदीच्या दरात ही घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरांमध्ये झालेली ही घट तात्पुरती आहे की येत्या काळात भाव आणखी कमी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.











