जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ ते फैजपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आशियाई विकास बँकेच्या (ADB) अर्थसहाय्याने सुरू असलेल्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत सध्या जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. यात विटवा, भुसावळ, जामनेर, फैजपूर, मोठाळा, तरवाडी फाटा या राज्य मार्ग क्रमांक ४४ वरील रस्त्याच्या कामाचा समावेश असल्याने १७ जूनपासून १६ जुलैपर्यंत भुसावळ ते फैजपूर रस्ता बंद राहणार आहे.

यासाठी अवजड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १३ जून रोजी काढली. या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार भुसावळ ते फैजपूर हा मार्ग १७ जूनपासून १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग
जड वाहनांसाठी : फैजपूर – हंबर्डी -हिंगोणा – सांगवी – चितोडा – यावल -भुसावळ.
हलक्या वाहनांसाठी : फैजपूर – हंबर्डी -भालोद – चिखली – अंजाळे – भुसावळ.











