पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

जून 17, 2026 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटना जळगाव जिल्हा आणि प्रज्ञावंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार पाल्य तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स, पेन्सिल किट आदी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

Distribution of school supplies

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, मार्कशीट, पालकांचे नाव व संपर्क क्रमांक यांची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे ९०२१९६९१०० या क्रमांकावर पाठवावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाची तारीख, वेळ व स्थळ याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now