⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नगररचना विभागातील गोंधळ थांबवावा : नगरसेवक प्रशांत नाईक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । जळगाव येथील जळगाव शहर महानगरपालिकेत नगररचना विभागातील कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असून तेथील सावळा गोंधळ थांबवावा अशी मागणी महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांचेकडे निवेदनाद्वारे स्थायी समिती सदस्य तथा मेहरूण येथील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगररचना विभागात १ जानेवारी २०२२ पासून ऑनलाईन प्रणालीद्वारे प्लॅन मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदी परवानग्या दिल्या जातात. कामकाजासाठी मात्र नागरिकांना ऑनलाईन प्रक्रियेसाठी निर्धारित कालावधी दिला जात नाही. तो ६० दिवसांचा आहे. सदर प्रक्रियेसाठी नगररचना विभागात एकच संगणकावर कामकाज हाताळण्यात येत आहे. यामुळे प्रकरणे निकाली काढण्यासाठी ऑफलाईनच्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी लागत आहे.

नकाशा तपासणी, कागदपत्रे छाननी यासाठी रचना सहायक यांना दोन वेळा, सहायक संचालक याना व नंतर आयुक्तांना एक प्रत्येकी एक वेळा कार्यवाही करून प्रकरण निकाली काढण्याची कार्यपद्धती आहे. प्रकरण दाखल झाल्यापासून ६० दिवसात निकाली न काढल्यास तेथे नकाशानुसार काम झालेले असल्यास सदर प्रकरण मंजूर असल्याचे ग्राह्य ठरविले जाते.

त्यामुळे रचना सहाय्यक, सहाय्यक संचालक, आयुक्त यांचे कामांसाठी अद्ययावत संगणक पुरविण्यात यावे, प्रकरण दाखल झाल्यापासून कुठल्याही अधिकारीला किती कालावधीमध्ये प्रकरण पूर्ण करणे, निकाली काढणे याची कालमर्यादा देण्यात यावी, अशीही मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे.

हे देखील वाचा :