एरंडोल शहरात ‘कोरोना लस आपल्या दारी’ मोहीमेला सुरुवात

नोव्हेंबर 28, 2021 7:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल शहरात ‘कोरोना लस आपल्या दारी’ या मोहिमेला रविवार दि.२८ पासून सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत प्रभागनिहाय लसीकरण करण्यात येणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Vaccin jpg webp

एरंडोल शहरात ‘कोरोना लस आपल्या दारी’ या लसीकरण मोहिमेला रविवार दि.२८ रोजी सुरुवात करण्यात आली. सकाळी ९ ते १ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, श्रीराम चौक, बुधवार दरवाजा परिसर, जोहरी गल्ली परिसर तर सायंकाळी ४ ते ७ यावेळेत पांडव वाडा, लक्ष्मीनगर, पद्मालयनगर, गुरुकुल कॉलनी आदी भागात लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, आनंदा चौधरी यांच्यासह मान्यवरांनी लसीकरण स्थळांना भेट देऊन आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे सरला गढरी, रीना बोरोले, केशव ठाकूर, नगरपालिकेचे तुषार शिंपी आदींच्या पथकाने लसीकरण केले

लसीकरणासाठी प्रांताधिकारी विनय गोसावी, एरंडोल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, मुख्याधिकारी विकास नावळे, कार्यालयीन प्रमुख हितेश, एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील, डॉ. फिरोज शेख यांसह नर्स, परिचारिका व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जय श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now