⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटतेय ; आज १२०९ कोरोनामुक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्याचा नाव घेत नसून सलग पाच-सहा दिवसापांसून २० च्या वर मृत्यू होत आहे. आज सर्वाधिक २४ जणांचा बळी गेला आहे. तर आज पुन्हा कोरोना नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. आज दिवसभरात ११४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. १२०९ रुग्ण बरे होऊन घरी गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या उद्रेक अधिक तीव्र होत आहे. महिनाभरापासून हजार, बाराशेवर नवे रुग्ण समोर येत आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांत नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्यांची संख्या थोडी जास्त असल्याने चित्र दिसत होते. आज १ हजार १४७ नवीन बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख १० हजार ४२४ वर गेली आहे. त्यापैकी बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ९७ हजार ३६२ वर गेली आहे. 

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज सर्वाधिक २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १९५५ वर गेला आहे.  जिल्ह्यात सध्या १११०७ रुग्ण उपचार घेत आहे.

जळगाव शहर-२३६, जळगाव ग्रामीण-२४, भुसावळ-१५३, अमळनेर-३८, चोपडा-१२४, पाचोरा-२५, भडगाव-१९, धरणगाव-३८, यावल-४३, एरंडोल-७२, जामनेर-५५, रावेर १३९, पारोळा -२७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-४१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण १ हजार १४७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.