दिलासादायक : जळगाव शहरात फक्त ७ रुग्ण तर १० तालुक्यात १० च्या आत संख्या

मे 31, 2021 7:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून बरे होणारे वाढू लागल्याने समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आज सोमवारी जिल्ह्यात १५८ नवे रुग्ण समोर आले आहे. तर आज ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona

जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत असून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाउनचा देखील मोठा प्रभाव पडल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे. नव्याने बाधितांची संख्या कमी होत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णही घटले आहेत. जिल्ह्यात सध्या ५ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आज पैकी १५८ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ९८५ झाली. तर ४९० रुग्ण बरे झाले, बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ८७४ वर पोचला आहे.  तर गेल्या २४ तासांत चार रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५३२ वर पोचला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-६, चोपडा-२, पाचोरा-१६, भडगाव-२ , धरणगाव-१, यावल-८, एरंडोल-१९, जामनेर-७, रावेर-४, पारोळा-२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-२, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now