⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्हा परिषदेत कोरोनाचा धोका वाढला

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आल्यानंतर अजून दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी बाधित आढळून आले आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कोरेानाची लागण झाली होती. आता कॉरोनच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा अनेकांना कोरोना आढळून येत असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्याच आठवड्यात तीन कर्मचारी बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने काही निर्बंध लावले होते. परंतु यात अजून कठोर निर्बंध लावण्याची गरज असल्याचा सूर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.