महत्वाचा निर्णय : ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

मे 26, 2021 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ ।  राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तौत्के वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीच्या ‘ब्रेक  द चेन’ आदेशाद्वारे विहित केलेल्या निर्बंधान्वये खालील बाबींचा अत्यावश्यक प्रवर्गांत समावेश केला आहे :

lockdown

आगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय   जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर  दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.

संबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु 10,000 दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड 19 महामारीची आपत्तीची अधिसूचना  अस्तित्वात असेपर्यंत  संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories