Saturday, May 28, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई-पास गरजेचा ; जाणून घ्या कसा मिळवायचा

corona maharashtra lockdown e pass know other district travel
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 23, 2021 | 4:50 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १ मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहेत. यात अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.  त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. तर जाणून घ्या  ई- पास कसा मिळवायचा…

कसा मिळवायचा ई- पास? 

– ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

– त्यानंतर ‘apply for pass here’  पर्याय निवडा.

– पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा.

– आवश्यक कागदपत्र इथं जोडा.

– प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.

– कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ती फाईल अपलोड करावी.

– अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.

– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तोच टोकन आयडी वापरुन तुम्ही ई- पास डाऊनलोड करु शकता.

– या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.

– प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

ई- पासबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे-

– अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.

– अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची गरज नाही.

– कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.

– ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in कोरोना
Tags: E-Passlockdownmaharashtraई- पासकोरोनाजिल्हांतर्गतप्रवास
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
honors cyclist corona warrior

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान

gulabrao patil

जळगाव जिल्ह्यात ४२ कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी

corona (2)

Jalgaon Corona Updates : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २३ एप्रिल २०२१

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist