भाजपाच्या जळगाव पश्चिम जिल्ह्याचा प्रशिक्षण वर्ग रामभाऊ मार्गे प्रबोधिनी येथे उत्साहात संपन्न

मे 23, 2026 9:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दिनांक १९ व २० मे २०२६ रोजी उत्तम स्थित रामभाऊ मार्गे प्रबोधिनी मध्ये जळगाव पश्चिम जिल्हा भाजपचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला .या वर्गामध्ये या संघटनात्मक जिल्ह्यातील १८५ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार रवींद्र जी चव्हाण यांच्या हस्ते झाले तर राष्ट्रीय सह संघटन मंत्री माननीय शिवप्रकाश जी यांच्यासह अकरा विषयांवर ज्येष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

bjp

समारोप सत्राचे अध्यक्ष स्थान नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी भूषवले .या वर्गासाठी मंडलाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी व मोर्चा आघाडी प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमचे सैद्धांतिक अधिष्ठान -विनयजी सहस्रबुद्धे ,विचार परिवार -प्रदीप पेशकार, सोशल मीडिया व एआय -विश्वास पाठक, कार्यकर्ता विकास सांभाळ व अपेक्षा -राजेश शिरवाडकर ,कार्यपद्धती -माननीय शिवप्रकाश जी ,बूथ प्रबंधन आमदार निरंजन डावखरे, व्यवहारिक सत्र- प्राध्यापक वर्षा भोसले, तेजस मालवीय ,सुरज आव्हाड ,सरकारच्या गरीब कल्याण योजना व त्यामध्ये संघटनेची भूमिका -आमदार मंगेश चव्हाण ,कार्यविस्तार – केशव उपाध्ये ,आमचा इतिहास व विकास -सुनील. कर्जतकर ,देशासमोरील राजकीय व सामाजिक आव्हाने- डॉक्टर राधेश्याम चौधरी आदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. बदलत्या काळाप्रमाणे राजकीय क्षेत्रातील बदलती परिस्थिती व आव्हाने याचा विचार करून जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना सदर विविध राजकीय विषयांच्या संबंधात सखोल मार्गदर्शन करण्यात आलें.

उद्घाटन सत्रामध्ये संबोधित करताना आमदार रवींद्र जी चव्हाण म्हणाले ,की बुथ,मंडल व जिल्हा स्तरावर नवीन क्षमता असलेले नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . सर्वांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहिल पाहिजे .सक्षम युवा आणि महिला नेतृत्व पुढे आणलं पाहिजे .आणि फेक नॅरेचीव्हला उत्तर देण्यासाठी नेहमी सतर्क राहील पाहिजे असे सांगितले.

प्रशिक्षण अभियानाचे राष्ट्रीय संयोजक सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी म्हणाले की, बैठक ,प्रशिक्षण ,प्रवास ,कार्यालय व आंदोलन हे आपल्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पक्षाचा बुथ,मंडल ते जिल्हास्तरावरचा कार्यकर्ता सक्रिय ठेवण्यासाठी नियमित बैठका महत्त्वपूर्ण असतात.सर्वांशी समन्वय ठेवून सामूहिक निर्णय प्रक्रिया हे आपल्या संघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. देशासाठी जगण्याचा मानस, विचारांवरील निष्ठा ,पक्षाप्रती समर्पण ,स्वयंशिस्त ही भाजपच्या कार्यकर्त्याची प्रमुख लक्षणे आहेत असे सांगितले.

समारोप सत्रा मध्ये बोलताना नामदार गिरीश भाऊ महाजन म्हणाले की ,आपण संघटनेच्या वाढीसाठी परिश्रम करा म्हणजे आपल्याला योग्य वेळी योग्य संधी नक्कीच मिळेल. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे .आणि सक्रिय योगदान देणाऱ्या पदाधिकारी याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा देखील पक्षामध्ये आहे. पक्षावर आईप्रमाणे प्रेम करा ,पक्ष तुमची नक्कीच काळजी घेईल असे सांगितले.यशस्वितेसाठी ॲड युवराज रायपूरकर,राजेंद्र सोनवणे,गोपाळ भंगाळे ,वर्ग व्यवस्था समितीतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

“जळगावपासून ४०० किलोमीटर दूर अंतरावर उत्तन येथील अतिशय निसर्गरम्य वातावरणात दोन दिवसाचा हा निवासी प्रशिक्षण वर्ग अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या वर्गाची नोंदणी ,शुल्क प्रदान, पावर पॉईंट प्रेझेंटेशन आदि सर्व व्यवस्था या डिजिटल होत्या. तर शेवटी प्रशिक्षणार्थींना २० प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा देणे अनिवार्य होते व त्या परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतरच प्रशिक्षण पूर्णत्वाचे ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देखील देण्यात आले.या वर्गामुळे कार्यकर्त्यांमधे वैचारीक अधिष्ठान मजबूत होऊन समन्वय,संवाद,समर्पण ,संघभावना वाढीस लागते.आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमदार मंगेश दादा चव्हाण आदींच्या मार्गदर्शनामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या सहभाग व योगदानामुळे हा वर्ग अत्यंत यशस्वी ठरला .”
-डॅा राधेश्याम चौधरी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories