जळगावलाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । घराघरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या मोठे स्वरूप धारण करीत आहे.
जळगाव शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत आहे. या समस्येमुळे प्रयावरण प्रदूषण देखील होत आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, त्यामुळे या प्लास्टिकचे करायचे काय? हा प्रश्न प्रत्येकापुढे आहे. याला पर्याय म्हणून इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टने प्रजासत्ताक दिनापासून विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

शहरातील टाकाऊ स्वरूपातील प्लास्टिक गोळा करून ते रिसायकल केले जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण विकासासाठी व संवर्धनासाठी मदत होणार आहे. याकरिता नागरिकांनी इनरव्हील क्लबच्या पदाधिकार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे टाकाऊ प्लास्टिक जमा केले जाणार आहे. डिस्पोजेबल प्लास्टिकच्या पुनर्वापराबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. प्लास्टिक थैल्या, खाद्यपदार्थ्यांचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आदी प्लास्टिक या अभियानात देता येणार आहे. ओले आणि दुर्गंधीयुक्त प्लास्टिक गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक रिसायकल मोहिमेसाठी विक्रम मुणोत, डॉ.मयुरी पवार, आकार नियोन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच कचरा वेचणाऱ्या व गरीब महिलांना देखील काम दिले जाणार आहे. जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. त्यासाठी अध्यक्ष नीता परमार (८००७७८०८९६, ९२२५१२१४३१), बबिता मंधान (९३७३५९६२६३) यांचेशी संपर्क साधावा. अन्यथा आकार नियोन, ३४, गणेशवाडी या पत्त्यावर महिन्याच्या पहिला आणि तिसऱ्या मंगळवारी प्लास्टिक द्यावे असे इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?







