जळगाव । भाटपुरा (ता. शिरपूर) येथील हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक स्व. धर्मराज चंपालाल चौधरी (वय ८३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज, गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरात सांत्वना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. धर्मराज चौधरी (डी.सी. चौधरी सर) यांचे निधन २ एप्रिल २०२६ रोजी झाले असून, त्यांचे दशक्रिया विधी ११ एप्रिल रोजी पार पडले आहेत. जळगाव शहरातील त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्र परिवारासाठी ही सांत्वना बैठक मायादेवी नगरमधील ‘रोटरी भवन’ येथे आज सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

स्व. धर्मराज चौधरी यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून सेवा बजावली. ते जळगाव येथील ‘सृष्टी हॉस्पिटल’चे संचालक व भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाटपुराचे माजी सरपंच शैलेंद्र चौधरी आणि चोपडा येथील ‘सृष्टी सीड्स व फर्टीलायझर’चे संचालक नितीन चौधरी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी विमलबाई चौधरी, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.










