जळगावच्या रस्त्यांसाठी आ. राजूमामा भोळे विधानसभेत कडाडले…

ऑगस्ट 25, 2022 3:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरातील रस्त्यांची कामे त्वरित होण्यासाठी व शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे विधानसभेत कडाडले. यावेळी विविध प्रश्न आमदारांनी विधानसभेत मांडले. महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात आ.सुरेश भोळे यांनी रस्त्यांची समस्या मांडली.

आज दिनांक : २५ ऑगस्ट, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणेसाठी रस्ते विकासासाठी भरगोस निधी द्यावा, तसेच या पूर्वी मागणी केलेल्या एकूण १३० कोटी निधीची मागणी मंजूर करण्यात यावी. मागील काळात मंजूर १०० कोटी निधी पैकी उर्वरित ५८ कोटी निधी लवकरात लवकर मिळावा.अशी मागणी केली.

त्याचबरोबर जळगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी शहरात नवीन एम आय डी सी टाऊनशिप करिता मंजुरी द्यावी. जळगाव शहरातील महत्वाच्या समस्या सोडविणे बाबत मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत बैठक आयोजित करावी अशी मागणी सुद्धा केली

Suresh Bhole RajuMama jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now