---Advertisement---
जळगाव शहर

युडीज सोशल फाऊंडेशनतर्फे मोहन नगर ते रायसोनी नगर परिसरात साफसफाई मोहीम

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । शहरातील रायसोनी नगर, शंभूराजे हिल्स परिसर, नूतन वर्षा कॉलनी, मोहन नगर, संभाजीनगर या परिसरात गेले पाच दिवसापासून साफसफाई अभियान सुरू आहे युडीज सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

IMG 20221116 WA0063

नुकतेच दिवाळीचा सण आटोपला असला तरी शहरातील अनेक भागात अद्याप स्वच्छता दिसून येत नाही. आपला प्रभाग, आपली जबाबदारी असे समजून युडीज सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून रायसोनी नगर, शंभूराजे हिल्स परिसर, नूतन वर्षा कॉलनी, मोहन नगर, संभाजीनगर या परिसरात ५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात परिसरातील रस्त्यालगत वाढलेले गवत काढून व गटारी स्वच्छ करण्यात आल्या. अभियानाला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

---Advertisement---

युडीज सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी परिसर स्वच्छ करून घेतला. त्यांच्या या स्वच्छता सेवा उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर अनेक परिसरातील समस्या कमी होतील. परिसरातील रस्ते, गटार, मोकळे मैदान स्वच्छ राहणे हेच अभियान राबविण्यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचा हा लहानसा प्रयत्न असल्याचे उदय पवार यांनी सांगितले. उपक्रमासाठी हर्षा पवार यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---