जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगरपरिषद हद्दीत नवीन वसाहतीला लागून असलेल्या नाल्याची साफ-सफाई करून कीटक नाशकांची फवारणी करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना युवक काँग्रेसतर्फे देण्यात आले.
हद्दीतील गणपतीनगर, आयेशानगर, तिरुपतीनगर, चांदनगर व इतर नवीन वसाहतीत तिरुपती नगर, भास्कर नगर ते गणपती नगर व आयेशा नगर, चांदनगर होऊन अलाउद्दीन नगरला जोडणारा नाला आहे. ज्यात दुर्गंधीयुक्त घाण पाणी स्थानिक क्षेत्रातील गटारीतुन येत असते. गेल्या एक वर्षापासून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाण पाणी साचून आहे. यामुळे स्थानिक लोकांना डास, मच्छर, दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रसंगी रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष फैज़ान अब्दुल गफ्फार शाह, मुसतलीक शेख, शकील तडवी, जाबिर कुरेशी, रिजवान कुरेशी, नजीफ शेख, दानिश शेख अनिस शेख आदी उपस्थित होते.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज