शहरात घरफोड्या करणारा सायबू एलसीबीच्या जाळ्यात

मे 31, 2022 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जळगाव शहर आणि परिसरात घरफोड्या करणारा अट्टल चोरटा सायबुद्दीन उर्फ सायबू शेख रा.नशिराबाद याच्या जळगाव एलसीबीच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. पथकाने केलेल्या चौकशीत त्याने ८ ते १० महिन्यांपूर्वी नशिराबाद येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. नशिराबाद पोलिसात याबाबत गुन्हा दाखल असल्याने पुढील चौकशीकामी त्याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

lcb crime saybu jpg webp

शहरातील घरफोड्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, प्रितम पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, नितीन बाविस्कर, चालक पो.हे.कॉ. भरत पाटील यांचे पथक नेमले होते. पथकाने गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेल्वे स्टेशन परिसरात सायबुद्दीन उर्फ सायबू शेख नजमोहीन रा. परपोट मोहल्ला नशिराबाद हा मिळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ९ ते १० महिन्यांपूर्वी नशिराबाद येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

नशिराबाद पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने सायबूला पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now