⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

नागरिकांनो लक्ष द्या : जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । शहरातील बहुसंख्य भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागा तर्फे देण्यात आला आहे.


मनपा पाणी पुरवठा विभाग पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. वाघूर रॉ वॉटर पंपीग येथील विद्युत पंपाची दुरुस्ती, विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्यांची छटाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील गिरणा टाकी चर्चजवळ वाघूर पाणी पुरवठा योजनेतंर्गत टाकण्यात आलेली लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे १९ मे रोजी होणारा पाणी पुरवठा काम पूर्ण झाल्यानंतर २० मे रोजी नियमित वेळेवर करण्यात येणार आहे. २० व २१ रोजी होणारा पाणी पुरवठा अनुक्रमे २१ व २२ रोजी होणार आहे.