आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरातील वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद..

एप्रिल 13, 2026 1:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । जळगाव शहरातील वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या म्हणजेच १४ एप्रिल रोजी जळगाव शहरात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि मिरवणूक मार्ग सुकर व्हावा, यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

change trafic

शहरातील शनिपेठ, टॉवर चौक, चित्रा चौक आणि रेल्वे स्टेशन या मुख्य मार्गांवरून मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असून अवजड वाहने आणि एसटी बससाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

वाहतुकीचे महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे:

१. चोपडा, कानळदा, विदगांव कडुन शिवाजी नगर पुलावरुन येणारी सर्व ST बसेस, अवजड वाहने व फोरव्हिलर, थ्रिव्हिलर वाहने.
पर्यायी मार्ग- शिवाजी नगर, दुध फेडरेशन, उत्तुंग कॉर्नर, गुजराल पेट्रोलपंप, शिवकॉलनी, आकाशवाणी चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
तसेच जळगाव कडून चोपडा, विदगांव, कानळदा कडे जाणा-या सर्व ST बसेस, अवजड वाहने व फोरव्हिलर, थ्रिव्हिलर वाहनांना देखील सदर पर्यायी मार्गे वळविण्यात आलेली आहे.
२. पिप्रांळा, शाहुनगर, गोंविदा रिक्षास्टॉप वरुन येणारी वाहने कोर्ट चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत.
३. जळगाव कडून असोदा-भादली कडे जाणारी वाहने तसेच परत जळगाव येणारी वाहने
पर्यायी मार्ग – मोहन टॉकीज, गजानन मालसुरे नगर, लक्ष्मी नगर, कालींका माता, अजिंठा चौक, आकाशवाणी चौक मार्गे वळविण्यात आलेली आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now