रेल्वेचा तिकीट बुकिंग प्रणालीत बदल ; जनरल तिकीट घेणाऱ्यांना मिळेल मोठा फायदा

नोव्हेंबर 15, 2022 4:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. काही वेळा प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. मात्र आता यातून सुटका करून घेण्यासाठी रेल्वेकडून तिकीट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आला आहे. या बदलाअंतर्गत, रेल्वे मंत्रालयाने अॅपवरून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी कव्हर केलेले अंतर वाढवले ​​आहे.

train ticket 1 jpg webp

प्रवाशांचा वेळ वाचेल
या बदलानंतर, तुम्ही ज्या स्थानकापासून प्रवास सुरू करू इच्छिता त्या स्टेशनपासून दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता. अनारक्षित तिकिटांमध्ये मिळणाऱ्या या सवलतीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तिकीट काढण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमधून प्रवाशांची सुटका होणार आहे. वास्तविक, आतापर्यंत तुम्ही सुरुवातीच्या स्टेशनपासून 2 किमी दूर अॅपद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करू शकता.

आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आले आहे. स्थानकापासून दोन किमीचे अंतर असताना अनेकवेळा मोबाईल नेटवर्क गायब होण्याची समस्या निर्माण होत असल्याचे रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांना इच्छा असूनही रेल्वेचे तिकीट काढता आले नाही. यासाठी मंत्रालयाने हे अंतर आता 2 किमीवरून 20 किमी करण्यात आले आहे.

नवीन प्रणाली काय आहे
नवीन प्रणालीनुसार, उपनगरी नसलेल्या वर्गांसाठी, पाच किलोमीटरऐवजी, 20 किलोमीटर अंतरावरून अनारक्षित तिकीट बुक करता येईल. याशिवाय उपनगरीय विभागासाठी तिकीट बुकिंगसाठी हे अंतर 2 किमीवरून 5 किमी करण्यात आले आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांची स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिकिटासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now