⁠ 
बुधवार, मे 1, 2024

भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल, प्रवासापूर्वी जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२३ । भुसावळ विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. विजयवाडा विभागातील वारंगल-काझीपेठ स्थानक आणि विजयवाडा-गुडूर स्थानकादरम्यान तिसऱ्या लाइनच्या कामासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम केले जात आहे. कामादरम्यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

मार्ग बदललेल्या रेल्वे गाड्या अशा : गांधीधाम-विशाखापट्टणम साप्ताहिक एक्स्प्रेस (२०८०४) १० व १२ डिसेंबरला प्रवास सुरू होऊन नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा, विजयनगरम मार्गे विशाखापट्टणमला जाईल.

ओखा-पुरी साप्ताहिक एक्स्प्रेस (२०८२०) १३ डिसेंबरला नागपूर, रायपूर, टिटलागड, रायगडा, विजयनगरम मार्गे पुरी स्थानकात जाईल.
विशाखापट्टणम-गांधीधाम साप्ताहिक एक्‍स्प्रेस (२०८०३) गुरुवारी (ता.७) व १७ डिसेंबरला विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर मार्गे गांधीधामला जाईल.
पुरी-ओखा साप्ताहिक एक्‍स्प्रेस (२०८१९) १० व १७ डिसेंबरला विजयनगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर मार्गे ओखाला जाईल.